मालवणात १० एप्रिल रोजी लोकअदालत…

*💫मालवण दि.०८-:* मालवण तालुका विधी सेवा समितीतर्फे १० एप्रिल रोजी दिवाणी न्यायालय येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गने दिलेल्या निर्देशांचे पालन करून ही लोकअदालत होईल. पक्षकारांची प्रलंबित फौजदारी व दिवाणी प्रकरणे, वीज कंपनी, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायत इत्यादी प्रकरणे दाखल करून वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात यावीत. यासाठी पक्षकारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन न्यायाधीश भानूप्रताप बी. चौहान यांनी केले आहे.

You cannot copy content of this page