मळगाव कुंभार्ली येथे ग्रामपंचायतीच्या जागेत तलाव बांधून मिळावा…

ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांची मंत्री दीपक केसरकर यांच्याजवळ मागणी…

सावंतवाडी
मळगाव कुभार्ली भूतनाथ मंदिर येथील ग्रामपंचायत मालकीच्या 44 गुंठे जागेत तलाव बांधून मिळावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण उर्फ आना गावकर यांच्यासह अन्य सदस्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली.


मंत्री केसरकर यांना दिलेल्या निवेदनामध्ये मळगाव ग्रामपंचायत ची सर्वे नंबर 41 मध्ये 44 गुंठे स्वमालकीची जागा आहे. ग्रामपंचायत पूर्वी या जागेत पाणीसाठा करून नळ योजना व शेतीसाठी पाणीपुरवठा करत असे मात्र मागील काही वर्षापासून सदर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणीसाठा होत नाही त्यामुळे ग्रामपंचायतीची नळ योजना जानेवारी ते मे या दरम्यान बंद राहते तरी या क्षेत्रात तलाव तयार केल्यास पाणीसाठा होऊन नयोजना व गावातील शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल यासाठी प्रमाणात निधीची आवश्यकता आहे तरी ग्रामस्थ व ग्रामपंचायतची मागणी लक्षात घेता कुंभार्ली येथे तलाव बांधून मिळावा.यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सोनल सावळ, स्वरूपा राऊळ, रत्नमाला तळकटकर तसेच दीपक देवळी विनायक राऊळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page