जिल्हा परिषदेचा भजन चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न…

पालकमंत्री चव्हाण:५० मंडळांना भजनी साहित्याचे वाटप..

ओरोस ता.१०-: भजन हे सर्व जिल्हा वासियांना प्रिय आहे. प्रत्येक गावात, वाडीत आणि घराघरात भजन प्रेमी आहेत. या भजन प्रेमिंच्या मंडळाला साहित्य देण्याचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले आहे. हा स्तुत्य उपक्रम आहे. संस्कृतीला पाठबळ देण्याचे काम केले जात आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक चळवळीला अधिक बळ देणारी ही योजना आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या भजनी साहित्य वितरण कार्यक्रमात बोलताना केले.
जिल्हा परिषदेने स्वनिधी योजनेतून जिल्ह्यातील २५० भजनी मंडळाना मृदुंगमनी, पाच टाळ, एक चक्की असे भजनी साहित्य मंजूर केले आहे. या साहित्याच्या वितरणाचा शुभारंभ आज सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे पालकमंत्री चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. ५० भजनी मंडळाना हे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आ निरंजन डावखरे, प्रशासक प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, राजू राऊळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, दादा साईल, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, वासुदेव नाईक, विजय चव्हाण, वासुदेव नाईक, अरुण चव्हाण यांच्यासह असंख्य अधिकारी, कर्मचारी आणि भजनी मंडळ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अतिशय चांगले कार्यक्रम राबवित आहे. भजनी मंडळाचा भजनी साहित्य पुरवीत आहे. भक्तीत रंगणारा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्याला प्रोत्साहन देण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद करीत आहे, असे सांगितले.

You cannot copy content of this page