तिलारी घाटात रेफ्रिजरेटर व्हॅनचा अपघात…

चालक व सहकारी सुखरुप;व्हॅनचे नुकसान

⚡दोडामार्ग,ता. ०९-:
मुंबईहून गोव्याकडे फ्रोझन चिकन (गोठवलेले चिकन) घेवून जाणारी रेफ्रिजरेटर व्हॅन तिलारी घाटातील जयकर पॉइंट येथील वळणावर अपघातग्रस्त झाली.तीव्र उतार आणि उजवीकडे वळणारे तीव पण रुंद वळण याकडे दुर्लक्ष झाल्याने अपघात झाल्याची चर्चा आहे. वेगात असलेल्या व्हॅनवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती दर्शनी भागाने रस्त्यावर आदळून पलटी झाली आणि चारही चाके वर झाली.अपघातात केबिनचे नुकसान झाले. वेगातच व्हॅन वळवण्याचा प्रयत्न केल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे.अपघात शनिवारी
सकाळी सातच्या दरम्यान झाला.आठवडाभरातील हा दुसरा अपघात आहे.
अपघात झाला तेव्हा व्हॅनमध्ये दोघे होते.त्यांना काहीही इजा झाली नाही.गाडीच्या दर्शनी भागाचे मात्र मोठे नुकसान झाले.

तरीही अपघात का होतात?

तिलारी घाट खड्डेमुक्त झाला आहे.रस्ता आणि वळणे बऱ्यापैकी रुंद आहेत. वळणांची माहिती चालकांना व्हावी यासाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. मजबूत संरक्षक कठडे बांधण्यात आले आहेत.असे असताना सातत्याने अपघात होतात कसे असा प्रश्न पडतो.चालकाची बेफिकिरी व सूचनांकडे दुर्लक्ष अथवा वाहनांमधील बिघाड अपघाताला कारणीभूत ठरत असावेत.पोलिसांनी त्याबाबत चालकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.

You cannot copy content of this page