जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलचा कु . आशय शिंदे प्रथम व विभागस्तरीय निवड ….

⚡सावंतवाडी ता.०७-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा बुधवार दि. ०६-०९- २०२३ रोजी ओरोस
क्रीडासंकूल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु. आशय चंद्रकांत शिंदे याने जलतरण व डायव्हिंग स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले.
कु . आशय शिंदे याने १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये प्रथम आणि ५० मीटर फ्रीस्टाईल व ५० मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून विभागस्तरावर धडक मारली . कु. आशय याला त्याचे कोच श्री . दिपक सावंत आणि क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक कार्यकारिणी समिती पदाधिकारी यांनी कु . आशय शिंदे याचे अभिनंदन केले व पुढील विभागीय जलतरण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

You cannot copy content of this page