⚡कणकवली ता.०७-:
गोपाळकाल्यानिमित्त सर्वत्र दहीहंडीची धूम असताना कणकवली शिवाजीनगर येथील ट्विकल स्टार प्ले स्कूलमधील बालगोपाळांनी गुरुवारी गोविंदा आला रे आला या तालावर ठेका धरत दहीहंडी फोडत उत्सवाचा आनंद लुटला. या उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी कृष्ण, राधा, गोप्या व गोपिकांची वेशभूषा परिधान केली होती. शिवाजीनगर येथील ट्विकल स्टार प्ले स्कूलमध्ये हिंदू धर्मातील विविध सण व उत्सव साजरे करून बालकांना हिंदू संस्कृतीचे महत्व व दर्शन घडविले जाते. गोपाळकाल्यानिमित्त बालगोपाळांनी गोविंदा आला रे आला या तालावर दहीहंडी फोडत उत्सवाचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी कृष्ण, राधा, गोप्या, गोपिकांची केलेली वेशभूषा लक्षवेधी ठरले.
स्कूलच्या संचालिका सुनिता कदम यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व गोपाळकाल्याचे महत्व सांगितले. यावेळी शिक्षिका अंजली आजगावकर,सुविधा राणे,वैशाली तेली यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी महेनत घेतली.
ट्विकल स्टारच्या विद्यार्थ्यांनी लूटला दहीहंडीचा आनंद…
