जागतिक महिला दिनानिमित्त कुडाळ – मालवण येथील महिलांचा सन्मान

*💫मालवण दि.०७-:* जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कुडाळ – मालवण या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय युवक काँग्रेस व मालवणी संस्कृती व वारसा मंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सन्मान सप्ताह साजरा करण्यात येत असल्याची माहिती कुडाळ मालवण युवक काँग्रेस विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांनी दिली. या सन्मान सप्ताहाची सुरवात उद्या सोमवार ०८ मार्च २०२१ रोजी मालवण पोलीस ठाणे येथील महिला अधिकारी यांचा सन्मानाने होणार आहे कुडाळ मालवण या विधानसभा क्षेत्रात प्रशासनात तसेच लहान मोठे व्यवसाय – उद्योजक म्हणून ज्या महिला आपल्या कार्यात सक्षम पणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत अश्या महिलावर्गाचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही पल्लवी तारी यांनी दिली

You cannot copy content of this page