खारेपाटण येथे उद्या शिवसेनेच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन…

किरण उर्फ भैया सामंत यांचा पुढाकार राजापूर येथील प प्रसिद्ध महिला गोविंदा पथकाचा सहभाग…

⚡कणकवली ता.०६:- खारेपाटण येथील शिंदे शिवसेना यांच्या वतीने उद्या दि.७ रोजी विविध सांस्कृतिक उपक्रमांसह भव्य अशा “दहीहंडी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
किरण उर्फ भैय्याशेठ सामंत पुरस्कृत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय आंग्रे व युवा सेना जिल्हाप्रमुख श्री.सुकांत वरूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावाचा दहीकाला उत्सव हा संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असून येथील सार्वजनिक दहीकाला उत्सवात यंदा पौराणिक चलचीत्र,देखावे तसेच खारेपाटण एस टी बस स्थानक येथील भव्य मानाची दहीहंडी तसेच इतर बांधण्यात येणाऱ्या विविध दहीहंड्या आणि शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे या दहीकाला उत्सवाचे खास आकर्षण असणार आहे.अशी माहिती शिवसेना उप तालुकाप्रमुख श्री मंगेश गुरव यांनी दिली आहे.

खारेपाटण येथील दहीकाला उत्सव पाहण्यासाठी दशक्रोषितील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यंदा प्रथमच खारेपाटण येथे किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या पुढाकाराने शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून दहीहंडीचा भव्यदिव्य कार्यक्रम होत आहे.

खारेपाटण येथे या दिवशी गावात स्थानिक मंडळाच्या दहीहांड्या फोडल्या जातात. त्यानंतर खारेपाटण बंदरवाडी येथील सार्वजनिक दहीकाला दिंडी देखाव्यासह खारेपाटण बाजारपेठेत वाजत गाजत येते. दुपारनंतर खारेपाटण गावातील मुख्य दहीकाला उत्सवाला सुरवात होते. हा दहीकाला उत्सव व उंच दहीहंडी फोडण्याचा थरार पाहायला खारेपाटण मध्ये दशक्रोषीतील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात तसेच यावेळी खारेपाटण येथील दहीहंडी फोडण्यासाठी राजापूर मधील प्रसिद्ध महिला गोविंद पथक देखील येणार असल्याची माहिती उप तालुकाप्रमुख श्री मंगेश गुरव यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page