वेंगुर्ला ता.०६ मातोंड-गावठाणवाडी येथील रहिवासी, निवृत्त प्राथमिक शिक्षक, मातोंड देवस्थान मानकरी, मातोंड ग्रामपंचायतचे माजी सदस्य, गावठाणवाडीचे वाडेप्रमुख कै.सहदेव पाये परब गुरुजी (वय-९२) यांचे ६ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे.
देवस्थान मानकरी दीपक परब, सावंतवाडी येथील महालक्ष्मी रेस्टॉरंटचे मालक प्रदिप परब व सुनिल परब यांचे ते वडील तर पत्रकार दीपेश परब यांचे ते आजोबा होत.
