⚡बांदा ता.०६-: शेर्ले येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार रामदास जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वांना सोबत घेऊन गावातील तंटे गावपातळीवर सामंजस्याने मिटविण्यावर भर देणार असे रामदास जाधव यांनी स्पष्ट केले.
यावेळी सरपंच प्रांजल जाधव, उपसरपंच दीपक नाईक, सदस्य बाळा शेर्लेकर, धोंडू किनळेकर, श्यामराव सावंत, सौ. एकता नाईक, सौ. अनिषा शेर्लेकर, चैतन्या चांदेकर, श्रृती तारी, माजी सरपंच जगन्नाथ धुरी, दयानंद धुरी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजित मळीक, आरोग्य सहाय्यक एन. एन. बांदवलकर, कृषी सहाय्यक श्वेता बेळगुंदकर, आरोग्य सहाय्यिका हेमांगी गोवेकर, मेघा पंडीत, ग्रामस्थ अरुण धुरी, ज्ञानेश्वर धुरी, महेश खोबरेकर, संदेश जाधव, राजेश चव्हाण, विराज नेवागी, फजल रखांजी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
