*हत्तीच्या हल्ल्यात मोर्लेतील शेतकरी गंभीर जखमी

*💫दोडामार्ग दि.०६ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात हत्तींचे संकट पुन्हा गडद होत असून आज शेतात काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या मोर्ले येथील शेतकरी विश्वनाथ बाबी सुतार हे हत्तीच्या हल्ल्यात जखमी झाले. त्यांच्या पायाला व पोटावर जखम झाली असून त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी गोव्यात हलविण्यात आले. दोडामार्ग तालुक्यात गेली अनेक वर्षे हत्तीचे संकट असताना शासन फक्त उपाय योजनांच्या वेगवेगळ्या घोषणा करते कार्यवाही कोणतीही होत नसल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला मात्र आता धोका निर्माण झाला आहे. पालकमंत्र्यानी काही महिन्यांपूर्वी हत्ती पार्क ची घोषणा केली होती ती अजूनही अस्तित्वात आली नाही तसेच वनविभागाचे हत्ती प्रश्नी उपाय योजना ह्या तोकड्या पडत असल्याने या रानटी हत्तींचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे. या हत्ती हल्ल्यातील जखमीला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्या ठिकाणी दोडामार्ग शिवसेना संघटक संजय गवस, उपजिल्हा संघटक गोपाळ गवस, युवासेना प्रमुख भिवा गवस, विभाग प्रमुख लक्ष्मण आयनोडकर, उपविभाग प्रमुख मिलिंद नाईक, विभागप्रमुख संतोष मोर्ये, पोलीस पाटील तुकाराम चिरमुरे यांनी जखमींची विचारपूस करत त्यांना पुढील उपचारासाठी गोव्यात नेण्यास मदत केली यावेळी वनविभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.

You cannot copy content of this page