मोती तलाव नजीकची घटना:नागरिकांची गर्दी
⚡सावंतवाडी ता.३१-: येथील मोती तलाव परिसरात चार चाकी वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी घळणीत गेली. परंतु सुदैवाने कोणाला दुखापत झाली नसून गाडीचे मात्र किरकोळ नुकसान झाले. ही घटना आज रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
