प्रतिनिधी
बांदा
बांदा शहरातील बांदेश्वर मंदिर रस्त्यावरील सोसायटीच्या लगत असलेल्या गणेश रेसिडन्स मधील दुकान फोडून सुपारीची चार पोती चोरी करणाऱ्या सशयिताच्या 24 तासाच्या आत बांदा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. बाबा खान (वय २६, रा. बांदा-मुस्लिमवाडी) असे त्या सशयिताचे नाव आहे. सशयित हा सुपारी बांदा परिसरात सुपारी विकण्यासाठी फिरत होता.
बांदा येथील शामसुंदर रामकृष्ण नाटेकर यांच्या दुकानातील ४० किलोची ४ सुपारीची पोती चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आले होते. त्यानुसार त्यांनी बांदा पोलिसात तक्रार दिली होती. याबाबत बांदा पोलिसांनि घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला होता.
बांदा पोलिसांनी गुरुवारी सकाळी तपासाची चक्रे फिरवली बांदा परिसरातील सुपारी खरेदीदारांची चाचपणी केली असता त्यांच्या कडे वरील सशयित सुपारीचा दर काढण्यासाठी आल्याचे समोर आले. दरम्यान सायंकाळी बांदा पोलीस उपनिरीक्षक दीपक पडवळ, कॉन्स्टेबल सिताकांत नाईक, राजेश गवस यांनी बांदा आळवाडी येथुन त्याच्या मुसक्या आवळल्या तर त्याला खाकीचा हिसका देताच त्याने गुन्ह्याची कबुली देत मुद्देमाल कुठे आहे ते सांगितले. बांदा पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई करत मुद्देमालासह ताब्यात घेतले अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत. उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सुपारीची पोती चोरी करणाऱ्या सशयिताच्या 24 तासाच्या आत बांदा पोलिसांनी मुसक्या आवळल्या…
