⚡सावंतवाडी ता.०१-: युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ , सांगवे ,ता. कणकवली आयोजित सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत प्रशालेचा विद्यार्थी कु . श्रीराम मायप्पा पाटील ( इयत्ता ७ वी ) याने रौप्यपदक व प्रशस्तीपत्र प्राप्त केले.
अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, मुंबई आयोजित कथ्थक नृत्य परीक्षेत कु . आराध्या पंकज पाटील हिला प्रथम श्रेणी प्राप्त झाली.
महाराष्ट्र राज्य पुराष प्राविण्य स्पर्धा २०२३ मध्ये कु . कोमल सुजित विश्वास हिने २८ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.यावेळी उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
