⚡कुडाळ ता.३१-: नेरूर चव्हाठा हनुमान मंदिरमध्ये नेरूर चव्हाठा मित्रमंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या अध्यक्ष पदी सतीश सावंत यांची सर्वांमते निवड करण्यात आली. यावेळी सतीश सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी इब्राहिम शहा, रुपेश पावसकर, सुधीर नेरुरकर, प्रकाश साऊळ, बाबी साऊळ, राजू नेरुरकर, रमेश घाडी, रंजन सडवेलकर व देऊलकर उपस्थित होते.
त्यावेळी नेरूर गावामध्ये सामाजिक, शैक्षणिक उपक्रम आरोग्य, सांस्कृतिक विषयक कार्यक्रम आयोजन, शेतकरी तसेच नागरिकांच्या समस्या निवारण करणे ही प्रमुख उद्दिष्टे असल्याचे एकमताने ठरवण्यात आले.
तर अध्यक्ष सतीश सावंत यांनी सुद्धा नेरूर चव्हाठा मित्रमंडळाच्या माध्यमातून गावात सामाजिक सुधारणा करण्यात येतील. ते आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले. तसेच आपणावर दिलेल्या जबाबदारीबद्दल सर्वांचे आभार मानले.
