पर्यटन महासंघातर्फे आयोजित संस्कृती रॅली ठरली लक्षवेधी

⚡मालवण ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्त मालवण शहरातून भव्य अशी संस्कृती रॅली काढण्यात आली. यात साकारण्यात आलेली श्रीफळाची प्रतिकृती व सहभागी सजविलेल्या रिक्षा लक्षवेधी ठरल्या.

मालवण भरड ते बंदर जेटी अशी ही संस्कृती रॅली काढण्यात आली. यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी रिक्षांची रॅली काढण्यात आली. मालवण एसटी स्टॅन्ड ते भरड नाका, बाजारपेठ मार्गे बंदर जेटी अशी ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने रिक्षा व्यावसायिक सजविलेल्या रिक्षा घेऊन सहभागी झाले होते. यावेळी रिक्षा व्यावसायिकांनी देखील आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी मानाचा नारळ रिक्षा व्यवसायिक पप्या कद्रेकर यांच्या हस्ते समुद्राला अर्पण केला.

या रॅली मध्ये पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर अविनाश सामंत, भाऊ सामंत, दादा वेंगुर्लेकर, शेखर गाड, मंगेश जावकर, मेघा सावंत, अन्वेशा आचरेकर, श्वेता सावंत, संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, पंकज पेडणेकर, राजन परुळेकर, कैसर पठाण, श्री. पाटकर मिलिंद झाड, आदीजण सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page