कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या उपोषण इशाऱ्याची दखल

अनेक वीज प्रश्न मार्गी ;उर्वरित प्रश्न ८ दिवसात सोडविण्याचे आश्वासन..

⚡कणकवली ता.३१-: कलमठ गावातील वीज समस्या प्रश्नी सरपंच संदीप मेस्त्री यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महावितरण कडुन या उपोषणाची तात्काळ दखल घेत कलमठ ग्रामपंचायत मध्ये महावितरणचे अधिकारी दाखल होत दोन बैठका घेऊन यातील अनेक प्रश्न मार्गी लावले. व उर्वरित प्रश्न येथे आठ दिवसात सोडवण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली.

जवळपास ३ एबी स्विच, २ ट्रान्सफॉर्मर, २५ वीज खांब, अवघ्या ८ दिवसात काम पूर्ण करण्यात आली. कलेश्वरनगर, गावडेवाडी, महाजनीनगर, गुरववाडी, बॅक कॉलनीसाठी मनोहर शिल्प नजिक रिंग फिडींग काम सुरू झाले असून या परिसरात कणकवली शहरमधून पर्यायी वीज पुरवठा करण्यासाठी उपयोग होणार आहे. उर्वरीत कलमठ गावासाठी स्वतंत्र लाईनसाठी नवीन अंदाजपत्रक २ दिवसात केले जाईल असे श्रीराम राणे यांनी सांगितले असता त्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या मार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल असा शब्द सरपंच संदिप मेस्त्री यांनी दिला. गावडेवाडीसाठी २०० केव्ही तर बिडियेवाडीसाठी नवीन ट्रांसफार्मर बसवून झाला आहे. ११ केव्हि लाईन कलमठमधून आचरा रोड वरील वरवडे, पिसेकामते तर महामार्गावरून जाणवली, हुमरट,साकेडी व इतर गावांपर्यंत वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे कुठल्याही गावात बिघाड झाला तर कलमठ गावात वीज पुरवठा खंडित होतो. त्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिल्या. नंतर कलमठ गावाच्या सीमेवर लांजेवाडी, कुंभारवाडी व गावडेवाडीसाठी एबी स्विच
मंजूर करून बसवण्याचे काम सुरू झाले असून भविष्यात इतर गावात कोणताही लाईन बिघाड अथवा पावसाळी आपत्ती मध्ये एबी स्विचमुळे कलमठ गावात वीज पुरवठा सुरू राहण्यास मदत होणार आहे. या व्यतिरिक्त गावातील थ्रीफेज लाईन काम पूर्ण झाले असून नवीन वीज खांबसाठी मागणी केलेले बिडयेवाडी दत्तनगर, गणेश मंदिर व स्वराज्यनगर, मनोरमा पार्कसाठी नव्या स्ट्रीट लाईनचे काम सुरू असून ४ दिवसात पूर्ण होईल, शांतादुर्गानगर, नाडकर्णीनगर वीज खांब काम पूर्ण झाले व सुतारवाडी, गुरववाडी, टेंबवाडी, सिध्दार्थ कॉलनी ही सर्व कामे ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिले. गणेशोत्सव काळात रात्रीचा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जाईल असे सांगीतले. यासाठी उपकार्यकारी अभियंता श्री. अत्तार, श्री. बगडे, प्रकल्प येडगुळकर, श्रीराम राणे अधिकाऱ्यांनी कलमठ ग्रामपंचायत मध्ये २९ व ३१ रोजी बैठक घेऊन सर्व मागण्या मार्गी लावल्या असून उर्वरीत कामे ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी चर्चे दरम्यान माजी प. स. महेश लाड, उपसरपंच स्वप्नील चींदरकर, सदस्य दिनेश गोठनकर, नितीन पवार, आबा कोरगावरकर, बाबू नारकर, मिलिंद चिंदरकर, नाना गोठनकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page