*💫कणकवली दि.०६-:* कणकवली शहरानजीक श्री मुडेश्वर देवस्थान ठिकाणी साजरा होणारा महाशिवरात्री उत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. श्री मुडेश्वर देवस्थान ठिकाणी महाशिरात्रोत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मात्र कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार यावर्षी महाशिवरात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथील मुडेश्वर देवस्थानचा महाशिवरात्री उत्सव रद्द…
