अप्पासाहेब पटवर्धन पुण्यतिथी निमित्त गोपुरीत संविता आश्रम तर्फे श्रमदान शिबिर

कणकवली : कोकण गांधी स्वर्गीय अप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुण्यतिथीनिमित्त पणदूर येथील सविता आश्रमाच्या वतीने मंगळवार दिनांक 9 व बुधवार दिनांक 10 मार्च रोजी दोन दिवसीय श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या श्रमदान शिबिरामध्ये कणकवलीवासी यांचाही सहभाग असणार आहे. अशी माहिती सविता आश्रमाचे संस्थापक संदीप परब यांनी दिली आहे. सविताश्रमातील सदस्यांच्या वतीने गोपुरी मध्ये श्रमदान दोन दिवस करण्यात येणार आहे. १० मार्च रोजी स्वर्गीय आप्पासाहेब पटवर्धन यांची 50 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त 9 व 10 मार्च असे दोन दिवस श्रमदान करण्यात येणार आहे. या श्रमदान शिबिरामध्ये कणकवलीवासी यांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कमलेश गोसावी यांचा समानवता ट्रस्ट तसेच आम्ही कणकवलीकर मानवता ग्रुप आदी परिवारातील कार्यकर्त्यांचे ही योगदान या कार्यक्रमात असणार आहे. पणदूर येथील सविता आश्रमाचे कार्य हे वृद्धाश्रमाच्या पलीकडील आहे. अक्षरशः रस्त्यावर आलेल्या पुर्णतः उध्वस्त झालेल्या मनोरुग्णांची निराधारांची सेवा शुशृषा या आश्रमात करून तेथेच त्यांचे पुनर्वसन ही संस्था करते. ईश्वराने ही ज्यांना झिडकारलं आहे अशा मनोरुग्णांची निराधारांची काळजी सविता आश्रम ही संस्था घेते. दगडी कुंपण नसलेली, तुरुंगासारखे स्वरूप नसलेली ही संस्था मनोरुग्णांना निराधारांना आपलेपणाने सेवा देणारी सविता आश्रम ही राज्यातील एकमेव अशी बिन कुंपणाची संस्था असावी. सविता श्रमा मधील आश्रित स्वतः संस्थेची शेती करतात. तेथे कसतात तसेच जिल्ह्यात ठिकाणी जाऊन श्रमदाना सारखे उपक्रमही राबवितात आणि समाजाप्रती ऋणही व्यक्त करतात याचाच भाग म्हणून आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपुरी आश्रमामध्ये श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता श्रमदानासाठी गोपुरी परिसरात सुरुवात होईल 9 रोजी सविता श्रमातील सदस्य हे गोपुरी मध्येच निवास करणार आहेत दिनांक दहा रोजी सकाळी आठ वाजता पुन्हा श्रमदानाचा सुरुवात होईल संध्याकाळी पाच ते सात या वेळामध्ये शिबिराचा समारोप होणार असून यावेळेत सविता आश्रमातील सदस्य आणि कणकवलीकर यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी कणकवली वासियांना या श्रमदान शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन केले असून दिनांक दहा रोजी सकाळी पाच ते सात सायंकाळी या वेळात श्रमदान शिबिराचा समारोप तसेच सविताश्रम व कणकवली करांच्या वतीने होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहनही केले आहे

You cannot copy content of this page