*💫सावंतवाडी दि.०६-:* शहरात न्यू खासकिलवाडा परिसरात रसाळ मेस जवळ कॉसमॉस बिल्डिंग येथे इंडस टॉवर लिमिटेड कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात येऊ नये. अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. या परिसर लोकवस्ती असून, लहान मुलांची शाळा देखील आहे. त्यामुळे ठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवरमुळे लोकांच्या, लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होणार असल्याची भिती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
*न्यू खासकीलवाडा परिसरात मोबाईल टॉवर उभारण्यास नागरिकांचा विरोध*
