पुणे येथील युवकावर काळाचा घाला*

*💫सावंतवाडी दि.०५-:* पुणे नानापेठ येथील एका युवकावर गोव्यात पर्यटनासाठी आलेला असताना अचानक काळाने घाला घातला. नयन संतोष उगले (२३) असे त्या युवकाच नाव आहे. गोवा ते पुणे असा प्रवास करत असताना सावंतवाडी शहरात बस स्थानकालगत या युवकाला उलटी होऊन चक्कर आली असता त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. पुणे नानापेठ येथील युवक गोव्यात पर्यटनासाठी जात असताना सावंतवाडी बस स्थानक येथे तो अचानक चक्कर येऊन तो जमीनीवर कोसळला‌. यावेळी सामाजिक कार्यकर्ते समिर वंजारी, राजू धारपवार यांनी धाव घेत त्या युवकाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील, डॉ. अभिजीत चितारी, डॉ. मुरली चव्हाण, डॉ. निकिता मसुरकर यांसह उपजिल्हा रुग्णालयाच्या टीमन त्या युवकाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र युवकाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्या युवकाच ह्रदय कामं करण बंद झालं. ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्या युवकांच निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नयनच्या अचानक एक्झिटमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पर्यटनासाठी आलेल्या त्याच्या मित्रपरिवारालाही अश्रू अनावर झाले.

You cannot copy content of this page