गोळवण येथे २५ रोजी बांधकाम कामगार नोंदणी शिबीर

⚡मालवण ता.२३-: शिवसेना ठाकरे गटातर्फे २५ ऑगस्ट रोजी गोळवण बोरकरवाडी येथे बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी बांधकाम कामगारांचे ऑनलाईन अर्ज भरून नवीन नोंदणी केली जाणार आहे. कामगारांना कल्याणकारी योजनांचा घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. गोळवण येथे शिवसेना ठाकरे गटातर्फे राबविल्या जाणाऱ्या बांधकाम शिबिराचा जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी लाभ घेऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण व माजी उपतालुकाप्रमुख राजू नाडकर्णी यांनी केले आहे. याकरिता फोटो, आधारकार्ड, बँक पासबूक, रेशनकार्ड, ग्रामसेवक दाखला, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड आदी मूळ कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अनंत पाटकर (९०११९९५५०३), भाऊ चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page