वीज ग्राहकांना ताकद देण्यासाठी जिल्हा ग्राहक संघटना स्थापन…

संजय लाड:वीज ग्राहकांनी सहभागी होण्याचे केले आवाहन…

⚡सावंतवाडी ता.२२-; जिल्ह्यातील वीज वितरण सेवेची स्थिती पाहिल्यास नागरिकांना विविध समस्यांना समोरे जावे लागत आहे;
तरी या समस्यांच्या निवारणासाठी व वीज ग्राहकांच्या मागण्यांना ताकद देण्यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे.
नागरिकांना वीजेबाबत उद्भवणाऱ्या समस्यांचे वेगाने व शाश्वत निरसन करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे, तरी नागरिकांनी या संघटनेत सहभागी होऊन विजेच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेला बळ द्यावे असे आवाहन वीज ग्राहक संघटनेचे सावंतवाडी अध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.

You cannot copy content of this page