गायत्री वरगावकरचे जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेत यश…

⚡वेंगुर्ले ता.२०-: येथील न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाची विद्यार्थिनी कु. गायत्री लक्ष्मण वरगावकर हिने दत्तमाऊली पारंपरिक दशावतार शिक्षण प्रशिक्षण मंडळ व बहुउद्देशीय संस्था यांच्या त्रै पुर्ती सोहळ्या निमित्ताने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरावरीय निंबध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.

कु.गायत्री वरगावकर हि दहावी इयत्तेत शिकणारी न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूल विद्यार्थिनी असून तिने या स्पर्धेत दशावतार एक समृद्ध लोककला या विषयावर आपले विचार निंबध स्पर्धेतुन मांडत यश संपादन केले असुन
तिला लोककला अभ्यासक आणि न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूल हिंदी विषयाचे अध्यापक प्रा. वैभव खानोलकर आणि प्रशालेचे लिपिक अजित केरकर यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल मुख्याध्यापक वाळवेकर सर, संस्थाध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर, उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर, सचिव रांगोळीकार रमेश नरसुले याचबरोबर इतर पदाधिकारी यांनीही यशस्वी विद्यार्थिनी कु.गायत्री वरगावकर आणि तिचे मार्गदर्शक प्रा. खानोलकर, व अजित केरकर यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
या जिल्ह्यास्तरीय निंबध स्पर्धेतील मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे आणि तिच्या मार्गदर्शकाचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page