आगामी निवडणुका लढविणार

सागर खर्डे : मडुरा दशक्रोशीसाठी रुग्णवाहिका देणार

⚡बांदा ता.२०-: केवळ निवडणुकांपुरते काम न करता कृषी, आरोग्य, क्रीडा, सार्वजनिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असलेले मडुरा येथील सामाजिक कार्यकर्ते सागर खर्डे यांनी लवकरच मडुरा दशक्रोशीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच येत्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मडुरा दशक्रोशीसाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याचे अनेक अपघातावेळी निदर्शनास आले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार सुसज्ज अशी रुग्णवाहिका आणणार असून रुग्णालयापर्यंत रुग्णास पोहचण्यासाठी सोयीचे ठरणार असल्याचे श्री खर्डे यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात, सावंस्कृतिक क्षेत्रात खर्डे यांचे मोठं योगदान असल्याने दशक्रोशीतील मतदारांच्या अपेक्षेप्रमाणे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणूक लढविणार असल्याचे सागर खर्डे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page