राज ठाकरेंच्या खळ खट्याकच्या आदेशामुळे बांदा सटमटवाडी टोल नाक्याला पोलिस छावणीचे रूप…

सुरक्षिततेसाठी मोठा बंदोबस्त:शीघ्र कृती दलाची तुकडीही दाखल

बांदा/प्रतिनिधी-:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाक्यावर खळ-खट्याकचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याने सुरक्षिततेसाठी बांदा सटमटवाडी टोल नाक्यावर आज प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शीघ्र कृती दलाची तुकडी देखील याठिकाणी दाखल झाली होती.


हातीवले (राजापूर) टोल नाक्याची तोडफोड झाल्याने पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. बांदा टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तीन पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह १२ पोलीस कर्मचारी व शीघ्र कृती दलाचे १२ पोलीस याठिकाणी ठेवण्यात आले आहेत.
आज दिवसभर याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार या टोल नाक्यावर घडला नाही.

You cannot copy content of this page