आंबोली, ता.१४: येथील जंगलात फिरण्यासाठी आणि फोटो काढणाऱ्यांसाठी वनविभागाने आंबोलीत ग्रामपंचायत संयुक्त वनव्यवस्थापन समिती मार्फत फी ठरवण्यात आली आहे. जंगलाची माहिती आणि दर निश्चित केल्याचे फलक वनविभागाने लावले आहेत.
यावेळी वनपाल पूनम घाडगे,वनरक्षक अमृता पाटील, बाळा गावडे,मंगेश सावंत,श्री.सरमळलकर यांनी फलक लावले आहेत.याबाबत वनपाल पूनम घाडगे यांनी माहिती दिली आहे, “आंबोलीत जंगलात फिरण्यासाठी सध्या ५ ते ७ वाजेपर्यंत परवानगी आहे.त्यासाठी १०० रुपये प्रति व्यक्ती आकारले जाणार आहेत.७ ते ९ वाजेपर्यंत परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव वरीष्टांकडे पाठवला आहे. सध्या ७ पर्यंत परवानगी आहे.वन उद्यान येथे १० रुपये फी घेतली जाणार आहे.वन व्यवस्थापन समिती कर आकारणी करून त्यासोबत गाईड देखील देणार आहे.वनविभागाच्या मार्गदर्शक सूचना देखील सांगण्यात येणार आहे. विनाकारण रात्री कोणी रिजर्व फॉरेस्ट मध्ये आढळल्यास त्यावर वनविभागाची नजर असणार आहे.”
