खासदार विनायक राऊत यांचे बांदा ठाकरे गटाच्या वतीने स्वागत…

बांदा/प्रतिनिधी
खासदार विनायक राऊत यांचे आज सायंकाळी बांद्यात शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार राऊत हे सावंतवाडीच्या दिशेने जात होते. त्यावेळी शहरातील कट्टा कॉर्नर चौकात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बाळा गावडे, आबा सावंत, शब्बीर मणियार यांच्यासह शिवसेना बांदा शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, निखिल मयेकर, राजा खान, सागर धोत्रे, श्रीकांत धोत्रे, व्यंकटेश उरूमकर, तुषार मांजरेकर, उमेश शेटकर, भाऊ वाळके आदी उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेच्या शहरातील संघटनेबाबत तसेच विकासकामांसंदर्भात खासदार राऊत यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी संघटना अधिक मजबूत करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्यात.

You cannot copy content of this page