⚡वेंगुर्ले ता.१३-: सतत दुसर्या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ” हर घर तिरंगा ” उपक्रमा अंतर्गत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले एस् टी डेपोतील चालक , वाहक व वर्कशॉप कर्मचारी तसेच रिक्षा व्यवसायीकांना तिरंगा झेंडा वितरीत करण्यात आले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले . पुर्वी तिरंगा ध्वज फक्त शासकीय इमारतीवर लावता येत असे .परंतु २०२२ मध्ये ध्वजसंहितेत बदल केल्यानंतर सर्वसामान्याना हा अधिकार मिळाला .त्यामुळेच प्रत्येक घरात तिरंगा फडकविण्यात येतो . भारतीय ध्वजसंहितेच्या कलम २.१ नुसार प्रत्येक व्यक्तीस तिरंगा फडकविण्याचे स्वातंत्र्य आज आहे . प्रत्येकाच्या मनामध्ये देशभावना जाग्रृत करण्यासाठीच ” घर घर तिरंगा ” हे अभियान असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले .
वेंगुर्ले एस् टी आगारात तिरंग्याचे वितरण
भाजपा पक्षाशी संलग्न असलेली ” सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटना ” पदाधिकाऱ्यांना सोबत घेत वेंगुर्ले आगारात चालक , वाहक व वर्कशॉप कामगार यांना तिरंगा झेंडा वितरीत करण्यात आले . यावेळी आगार सचिव दाजी तळवणेकर , विभागीय उपाध्यक्ष भरत चव्हाण , वेंगुर्ले स्टॅन्ड इनचार्ज निलेश वारंग , वाहतूक नियंत्रक लालसिंग पवार व हरेश पाटकर , सुरक्षा रक्षक धुरी , तेजस जोशी , संजय झोरे , अंकुश केरकर , राजेश तांडेल , सत्यवान परब ,रामचंद्र पालकर तसेच वर्कशॉप कर्मचारी आईर , बेग , चव्हाण , तेंडुलकर , पेडणेकर व कुडव उपस्थित होते .
रिक्षा व्यवसायीकांना तिरंगा वाटप
वेंगुर्ले शहरातील रामेश्वर मंदिर रीक्षा स्टॅन्ड वरील रिक्षा व्यवसायीकांनाही तिरंगा झेंडा देण्यात आले . यावेळेस रिक्षा व्यवसायीक भोले परब , बाळु कुबल , शंकर सावंत , दादा नवार , रवि राऊळ , मोहन कुर्ले , भावेश परब इत्यादी उपस्थित होते .
या झेंडा वितरणावेळी ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , किसान मोर्चाचे प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , युवा मोर्चाचे हेमंत गावडे , सुनील मठकर इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .
