गावराईत अमृतमहोत्सवपर शुर विर मानवंदनपर शिलाफलकाचे पुजन

माझी माती माझा देश; वृक्षारोपणासह पंचप्राण सह घेतली शपथ.

⚡सिंधुदुर्गनगरी१३-: देशाच्या
स्वातंत्र्यासाठीअनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांची आठवण म्हणूनअशा शूरवीरांना मानवंदना आणि आदरांजली वाहण्यासाठी उभारणेत आलेला शिलाफलक,माझी माती माझा देश या कार्यक्रमातून तरुणांनी आणि गावातील ग्रामस्थांनी महत्व लक्षात .सर्वांनी एकजुटीने आचरण करणे आणि उपस्थीती महत्त्वाची आहे असे प्रतिपादन माजी सैनिक जनार्दन घाटू काळे यांनी केले.


गावराई ग्राम पंचायत आवारात अमृत महोत्सवी ध्वजारोहण कार्यक्रमा नंतर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात शीला पूजन वृक्षारोपण माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत कलशांमध्ये माती गोळा करणे स्वातंत्र्य वीराना वंदन पंचप्राण शपथशीला पूजनाच्या ठिकाणी पणत्या पेटवून व पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीरांना मानवंदना देण्यात आली यावेळी माजी सैनिक जनार्दन घाटू काळे सरपंच सोनाली शिरोडकर ग्रामसेवक सुनील वारंग ग्रामपंचायत सदस्य संजय आयरे अर्चना जंगले विजय आंगणे अंगणवाडी सेविका रुची परुळेकर मंदा खरात सौ मेस्त्री माजी सरपंच विकास गावडे शुभांगिनी राऊत .मनोरमापरब प्रशाळेचे शिक्षक सावंत गोसावी श्रद्धा पावसकर आशा ज्योती कदम माजी सैनिक विठ्ठल काळे आरोग्य सेवक गावडे राजन कदम पोलीस पाटील स्वप्निल वेंगुर्लेकर दर्शना म्हस्कर ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप राऊत शंकर सावंत सुनंदा राऊत पत्रकार संजय वालावलकर नंदकुमार आयरे डीटीपी ऑपरेटर स्वाती घाडीगावकर आणि गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती प्रारंभी उपस्थिताचे स्वागत करण्यात आले त्यानंतर ग्रामसेवक सुनील वारंग यांनी
पंचप्राण शपथ दिली मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत गावातील माती एका कलशात घेऊन त्याचे पूजन केले यावेळी जनार्दन घाटू काळे विठ्ठल काळे यांच्यासह माजी सैनिकांचा शाल श्रीफळ देऊन सरपंच सोनल शिरोडकर यांनी सत्कार केला प्रास्ताविकात ग्रामसेवक सुनील वारंग यांनी स्वातंत्र्य काळातील परिस्थिती आणि आताचे प्रगत तंत्रज्ञान याची परिस्थिती वेगळी आहे व त्यावेळी ची परिस्थिती जिगरी होती समोर परकीय देशातून होणारी आक्रमणे यामुळे समोरासमोर जवान शहीद होत होते त्याची आज आपण कल्पना करू शकत नाही जम्मू-काश्मीर लडाख यासह महाराष्ट्रातील गडचिरोली सारख्या भागात सहज फिरणे शक्य नाही आपण या स्वातंत्र्यवीरांना मानवंदना देण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी एकजुटी आणि सलोखा दाखवून गावाचा विकास साधण्यासाठी एकजुटीने राहिले पाहिजे माझी माती माझा देश या भूमिकेने कार्य केले पाहिजे शासनाने हा उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत परंतु आपल्या देशाबद्दल प्रेम आणि आत्मीयता प्रत्येकाच्या मनात बाळगावी यासाठी शासनाने अमृत महोत्सवी सांगता कार्यक्रमाचे नियोजन केले आहे आज पासून स्वातंत्र्य दिनापर्यंत होणाऱ्या या उपक्रमाला सर्वांनी हातभार लावूया
माजी सैनिक जनार्दन घाटू काळे यांनी आपले विचार व्यक्त करतानास्वातंत्र्यपूर्व काळाची परिस्थिती होती आज आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालं आणि आज स्वातंत्र्याची ७५ वी सांगता करत आहोत स्वातंत्र्यवीरांना मानवंदना देत आहोत अशा शूरवीरांनी स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जे बलिदान केले आहे त्यांच्या या बलिदानासाठी गावाची एकजूट आपण भारतीय आहोत याची जाणीव ठेवून आणि गावाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे यावेळी विठ्ठल काळे यांनी त्यावेळीच्या एकूण परिस्थितीचा मागवा घेत अनेक सैनिक परक्यांच्या गोळ्यांमुळे शहीद झाले आहेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे अशा या स्वातंत्र्यवीरांच्या साठी एकजूट आणि आत्मीयता बाळगणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे सरपंच सोनल शिरोडकर यांनी आपले विचार व्यक्त करताना उपस्थिताचे स्वागत करून आपले विचार व्यक्त करताना स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमावर १३ ते १५ या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आज १३ रोजी झेंडावंदन आणि शिलापूजनाचे अनावरण माझी माती माझा देश हा उपक्रम त्याचबरोबर पंचप्राण शपथ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपले प्राण गमविले त्यांना मानवंदना देण्यासाठी गावातील ग्रामस्थांची एकजूट मतभेद बाजूला ठेवून एक भारतीय नागरीक म्हणुनउपस्थित राहणे हे प्रथम कर्तव्य आहे २०५७ पर्यंत भारत देश आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करून गुलामींची मानसिकतामुळापासून नष्ट करू देशाच्या समृद्ध वारसांना गौरव करून भारताची एकात्मता बलशाली करण्यासाठी देशाचे आणि गावातील नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन केले पाहिजे अशी शपथ आपण घेऊया आणि गावाच्या विकासासाठी एकजुटीने संघटित होऊया त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले
पोलीस पाटील स्वप्निल वेंगुर्लेकर यांनी देशाच्या सीमेवर त्यावेळची परिस्थिती पाहता आज आपण सुखी आहोत नवतरुणांनी अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे आपले कर्तव्य समजून सीमेवर लढता लढता अनेक शूरवीरांनी बलिदान दिले त्याचे चित्र आत्मसात करायला हवे भारत माता भूमी सुरक्षितेसाठी प्राण गमावलेल्या वीरांचे सन्मान केला पाहिजे त्यांचे ऋण आपण फेडू शकत नाहीत हा दिन त्या दिवसापुरता न ठेवता प्रत्येक दिवस त्यांच्या साठी सन्मानित करूया
माजी ग्रामपंचायत सदस्य राजन कदम यांनी आपले बहुमोल विचार व्यक्त करताना देशाच्या सीमेवर लढलेल्या जवानांनी या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाच्या बाबत विचार व्यक्त करून या शूरवीरांच्या मानवंदनेसाठी गावाने एकजूट दाखविली पाहिजे आणि गावाच्या विकासासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून संघटित व्हायला हवे.

Box घेणे
गावराईत रानभाज्यांचे भव्य प्रदर्शन
आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या हे एक महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या गावात परिसरात पावसाळ्याच्या कालावधीत अनेक रानभाज्या मिळतात आरोग्याच्या दृष्टीने या आज भाज्यांची गावातील ग्रामस्थांना आणि जनतेला महत्त्व पटावे यासाठी गावराई शाळा नंबर एक च्या वतीने आरोग्य उपकेंद्र येथे रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी सुरण , शेवगा , कुर्डू ,लाल भाजी , टायकुळा पेवगो यासह अनेक विवीध रानभाज्यांचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले होते या प्रदर्शनाला सरपंच सोनल शिरोडकर शाळेचे मुख्याध्यापक सावंत गुरुजी ग्राम पंचायत सदस्य ग्रामसेवक सुनिलं वारंग व अन्य शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या रानभाज्यांचे महत्त्व काय आहे याबाबत माहिती दिली

You cannot copy content of this page