मनसेचे शैलेद्र नेरकर यांचा अण्णा कोदे यांना सल्ला
⚡कणकवली ता.१२-: भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी त्यांच्या भाजप पक्षातील सेंटलमेंटवाले किती टक्के घेतात त्याचा शोध घ्यावा मगच मनसेचे माजी आ. उपरकरांवर टिका करावी अशी प्रतिक्रया मनसेचे माजी शहराध्यक्ष शैलेद्र नेरकर यांनी दिली.
स्वतःच्या पक्षाचे आमदार किती टक्क्याने कामे देतात व ती काम पक्षातील कार्यकात्यांना न देता परस्पर दिली जातात. याचाही शोध श्री. कोदे यांनी घ्यावा. कणकवली शहरातील ८०० फुटांचे शौचालय बांधण्याकरिता सुमारे ८६ लाख रूपये खर्च करण्यात आले. त्याचप्रमाणे कठडा बांधण्यासाठी ३६ लाख व नगरपंचायती ईमारतीचे रंगकाम करण्यासाठी १८ लाख रूपये खर्च करण्यांत आला त्यातील सेटलमेंटचा खुलासा अण्णा कोदे यांनी करावा. त्यामध्ये कोदे यांची किती सेटलमेंट झाली ?श्री. कोदे हे ज्या व्यापाऱ्यांची बाजू घेतात त्याच व्यापाऱ्यांनी कणकवली नगरपंचायत निवडणुकीत बाजारपेठेतून त्यांना का पाडले ?याचा शोध घ्यावा. अण्णा कोदे ज्या व्यापाऱ्यांची बाजू घेत आहेत ते किती ग्राहकांना जीएसटीची बिले देतात त्याचाही शोध घ्यावा. व कणकवली बाजारपेठेत इतर परप्रांतीय व्यावसायिक किराणासाठी, कपडा व्यापारासाठी, इलेक्ट्रीक व इतर व्यापारी स्वस्त दरात सामान विक्री करतात. जीएसटीची बिले देत नाहीत त्यांच्याशी श्री. कोदे यांनी अगोदरच सेटलमेंट केली आहे काय ? श्री. कोदे यांनी स्वतःच्या राजकारणाची सुरूवात ज्या श्री. उपरकरांच्या हाताखाली केली त्यांना ही दुबुद्धी दुसऱ्यांच्या शिकवणीवरून झालेली असावी मात्र माजी आम. परशुराम उपरकर हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आवाज उठवित असतात त्याप्रमाणेच त्यांनी जनतेच्या हितासाठी कणकवलीत आलेल्या कपडा सेलच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सणासुदीच्या काळात जनतेला स्वस्त वस्तू मिळत असतील तर कुठे बिघडले? कारण व्यापारी ग्राहकांना सवलत देत नाहीत. त्यामुळे अण्णा कोदे यांचा सेलसाठी विरोध का असावा? “की सेटलमेंट” न झाल्यामुळे सेल बंद करण्यास भाग पाडण्यासाठी भाजप शहराध्यक्ष जबाबदार आहेत काय ?
व्यापाऱ्यांनी आ. नितेश राणे यांनी सेल बंद केल्याबद्दल प्रेस घेऊन नितेश राणे यांचे एका बाजूने आभार मानले व तो जीएसटी भरत नसल्याचे सांगितले. नितेश राणेंना सांगून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण जनतेच्या आग्रहास्तव गणपती सणापुर्वी जीएसटी नंबर काढून सुरत व अन्य ठिकाणाहून माल आणून त्याच धर्तीचा सेल कणकवलीत सर्वसामान्य जनतेसाठी मनसेमार्फत सुरू करण्यात येणार आहे. असे शैलेद्र नेरकर यांनी सांगितले.
