रस्त्यासाठी महेश जावकर यांनी स्टंटबाजी व राजकारण करू नये…

अन्यथा गाठ आमच्याशी:गणेश कुशे यांचा इशारा

⚡मालवण ता.१२-:
मालवण शहरातील फोवकांडा पिंपळपार ते साधले तिठा या रस्त्याचे काम मंजूर असून त्याची टेंडर प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. फक्त पावसाळ्यात रस्त्याची कामे करत नाहीत हे २५ वर्षे नगरपालिकेत वावरलेल्या महेश जावकर यांना माहीत नाही का ? की फक्त उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ते नगरपालिकेत होते ? रस्त्यासाठी आंदोलन अवश्य करा. मात्र, स्टंटबाजी करू नका, जनता हुशार आहे. राजकारण आम्हालाही करता येते. मात्र जनतेची दिशाभूल कराल तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे, असा सूचक इशारा मालवणचे माजी नगरसेवक व मालवण शहर भाजपचे पदाधिकारी गणेश कुशे यांनी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

मालवण शहरातील पिंपळपार ते साधले तिठा हा रस्ता गेली ७ वर्षे रस्ता झाला नाही. आता तो रस्ता आमदार वैभव नाईक यांच्यामुळे होतोय असे जर महेश जावकर म्हणत असतील तर गेली ७ वर्षे आमदार वैभव नाईक आणि महेश जावकर झोपले होते का ? आम. नाईक यांना रस्ता करायचाच होता तर सत्ता असताना का नाही केला ? असा सवालही गणेश कुशे यांनी उपस्थित केला आहे. तसेच जावकर यांच्या २० वर्षाच्या कार्यकाळात झाली नाहीत ती कामे गेल्या ७ वर्षात झालीत. जावकर यांनी २० वर्षात केलेली कामा सांगावी , मी ५ वर्षात केलेली कामे सांगतो, असे आव्हानही गणेश कुशे यांनी दिले आहे.

आता माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुाव्यामुळे शहरातील भाजपच्या लोकप्रतिनिधी मागणीवरून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शहरातील अनेक कामांना निधी दिला, म्हणून ही कामे होत आहेत. मात्र त्यांचं साधं नाव घेण्याचं औदार्य जावकर यांच्यात नाही. वर स्वतःच्या मागणी पाठपुराव्यातून काम झाल्याचे सांगत फुकटच्या फुशारक्या मारत आहेत. मंजूर कामांची भूमिपूजन करून जनतेला ती कामं आमच्यामुळे झाली असं भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करता, हे जावकर यांना शोभते का ? असा सवालही कुशे यांनी उपस्थित केला आहे.

You cannot copy content of this page