⚡बांदा ता.१२-: पाडलोस जिल्हा परिषद शाळा नं 2 मधील विद्यार्थ्यांना गतवर्षी वह्या व गणवेश वाटप केले होते. यावर्षी पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी मुलगा साईश नाईक याचा वाढदिवस साजरा न करता गावातील देऊळवाडी व केणीवाडा मधील मुलांना दप्तर व खाऊचे वाटप केले.
यावेळी रिद्धी गावडे, सिद्धी गावडे, साईश नाईक, वैभव नाईक, बंटी नाईक आदी उपस्थित होते.
गावातील विद्यार्थ्यांना आपल्यापरीने शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात कायम सहकार्य केले व करत राहणार असल्याचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी सांगितले.
