⚡ओरोस ता.०७-: छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस सिंधुदुर्गनगरीमधील बीएससी चौथ्या वर्षात शिकत असलेल्या कृषिकन्या कुडाळ तालुक्यातील पडवे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये गायत्री कुऱ्हे, साक्षी बांदल, रितू गावडे, प्रणाली सावंत, राजेश्वरी राऊत या विद्यार्थिनींचा समावेश आहे.
ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२३-२४ या वर्षा करिता पडवे येथे या विद्यार्थिनी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत गावामध्ये राहून शेती विषयक माहिती जाणून घेणार आहेत. गावात राहून ग्रामीण शेती विषयक कार्यपद्धती, विविध संस्था, शाळा व प्रत्यक्ष शेतीवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करतानाच विविध प्रकारचे प्रात्यक्षिके करून दाखवणार आहेत. या कृषिकन्यांनी सुकळवाड ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी सरपंचांनी त्यांचे स्वागत केले.
