⚡मालवण ता.०६-: मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनसीसी विभागामध्ये प्रवेश घेतलेला एनसीसी कॅडेट चंदन कोळेकर याची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड झालेली आहे.
महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या प्रवेशासाठी चंदन कोळेकर याने शारीरिक आणि लेखी परीक्षा दिली होती. या दोन्ही परीक्षा त्याने यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला आपल्या करिअरवर त्याने लक्ष केंद्रित करीत त्याने यश संपादन केले
त्याच्या या प्रयत्नाला या सिंधुदुर्ग कॉलेज मालवणच्या एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर कॅप्टन एम .आर .खोत यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
त्याच्या या यशाबद्दल कृ सी देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर सेक्रेटरी गणेश कुशे , सर्व विश्वस्त मंडळ, कॉलेजचे प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर कॉलेजचा सर्व प्राध्यापक वर्ग तसेच सर्व NCC cadets यांनी अभिनंदन केले आहे .
