प्रकाश मेस्री यांचे प्रतिपादन:चिंदर शाळा नं 1 येथे वाचन स्पर्धा संपन्न …
⚡मालवण ता.०६-: आधुनिक युगात सोशल मिडियाच्या वाढत्या वापरामुळे पुस्तक वाचन प्रमाण कमी झाले आहे. वाचन संस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी विद्यार्थी दशेपासूनच मुलांनी वाचनाची आवड अंगीकारावी ज्यामुळे तुमचे व्यक्तीमत्व घडण्यास मदत होईल असे प्रतिपादन श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथ संग्रहालय चिंदर कार्यकारीणी सदस्य प्रकाश मेस्री यांनी येथे बोलताना केले.
चिंदर येथील श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथ संग्रहालय चिंदर यांच्यावतीने केंद्र शाळा चिंदर नं 1 येथे वाचन स्पर्धा संपन्न झाली. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वन व शिक्षक पांडुरंग कोचरेकर व केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर यांच्या हस्ते सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करुन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते
स्पर्धेत लहान गटात चिंदर मधील विविध शाळांच्या 20 मुलांनी तर मोठ्या गटात 4 मुलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत लहान गटात-कु. श्रेयस राजेंद्र चौधरी, इयत्ता 4 थी कुंभारवाडी शाळा याने प्रथम क्रमांक, कुमारी चैताली शंकर अपराज इ 4 थी, शाळा अपराज- कोंडवाडी हिने व्दितीय क्रमांक, कुमारी केतकी प्रमोद गांवकर इ. 2 री, शाळा गावडेवाडी हिने तृतीय- उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.
मोठ्या गटात कु. अंकित अमर खरात, इ. 7 वी, चिंदर अपराजवाडी कोंडवाडी शाळा याने प्रथम क्रमांक, कु. वेदांत आशिर्वाद तावडे इ. 7 वी, शाळा चिंदर नं 1 याने व्दितीय क्रमांक तर आर्यन संतोष अपराज, इ. 7 वी, चिंदर अपराज-कोंडवाडी शाळा याने तृतीय-उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. प्रथम, व्दितीय क्रमांकाना स्कूल बँग व प्रशस्तीपत्र तर तृतीय क्रमांकाला कम्पासबाँक्स व प्रशस्तीपत्र देवून अध्यक्ष भालचंद्र केळकर, उपाध्यक्ष गोपाळ(भाई) चिंदरकर तसेच मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण पांडुरंग कोचरेकर यांनी केले. प्रास्तविक रावजी तावडे यांनी तर सुत्रसंचालन भिमाशंकर शेतसंदी-नवनाथ भोळे यांनी केले.
यावेळी कार्यकारीनी सदस्य हिमाली अमरे, विवेक परब, ग्रामपंचायत सदस्य सौ. दुर्वा पडवळ-जान्हवी घाडी, मनवा चिंदरकर, निलिमा घाडी, शिक्षक-प्रविण तेली-नंदकुमार जुंधळे, अमोल खेडकर, शत्रघ्न बुटे, किरण कांबळी, दिशांत पडवळ, शा. क. अध्यक्ष रणजित दत्तदास, सौ. कदम, सौ. चेंदवनकर ग्रंथपाल-स्वरा पालकर तसेच बहुसंख्य विद्यार्थी पालक उपस्थित होते.
