Headlines

महाराष्ट्र राज्य विद्यार्थी हक्क कृती समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी व कोकण विभाग प्रभारी पदी मिहीर बुद्धिधन तांबे

⚡मालवण ता.०५-: महाराष्ट्र राज्य विद्यार्थी हक्क कृती समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी व कोकण विभाग प्रभारी पदी मालवण तालुक्यातील वेरली येथील मिहीर बुद्धिधन तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र विद्यार्थी हक्क कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष चेतन पाटील व संस्थापक सचिव रामराजे काळे यांनी मिहीर तांबे यांना दिले आहे.

विद्यार्थी चळवळीतील मिहीर तांबे यांच्या योगदानाची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष चेतन पाटील यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे. तसेच या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी मोलाचे कार्य कराल असा विश्वासही त्यांनी मिहीर तांबे यांच्यावर दाखवला आहे. या नियुक्तीबद्दल मिहीर तांबे यांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page