घटनेने खळबळ:पोलिसांत तक्रार दाखल
⚡आंबोली,ता.२८-: येथील गावठणवाडीत गुरूवारी रात्री (ता.२८) साडे बारा नंतर अज्ञात टोळक्याकडून दहशद माजवत घरांवर दगडफेक केली.आपले नुकसान करण्यात आले.याबाबतची तक्रार आंबोली पोलीस स्थानकात अर्जुन न्हानू राऊत यांनी दिली आहे.व पोलिसांनी शोध घेऊन कारवाईची मागणी केली आहे.
आंबोली परिसरात दहशद माजवणाऱ्या अज्ञात टोळक्यांचा शोध घेत त्यांचा पोलिस प्रशासनाने बंदोबस्त करावा. आंबोली मुख्य रस्त्यावरील हिरण्यकेशी फाटा येथील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासण्यात यावेत. तसेच त्या अज्ञात टोळक्यांची मदत कोणी करत असेल तर त्यादृष्टीनेही तपास करावा. अशी तक्रार श्री राऊत यांनी केली आहे.याबाबत रात्री आंबोली पोलिसांना दूरध्वनी केल्यानंतर पोलीस हवालदार दत्ता देसाई,दीपक शिंदे,राजेश नाईक यांनी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी तेथून पसार झाल्याचे राऊत यांनी सांगितले.यानंतर आंबोली पोलिसांनी पेट्रोलिंग केल्याचे तसेच श्री.राऊत यांची तक्रार आल्याचेही पोलीस नाईक दीपक शिंदे यांनी माहिती दिली.
