सावंतवाडी ता.२४-: सोमवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तळवडे म्हाळईवाडी येथील गुरुनाथ चंद्रकांत नागवेकर यांच्या घराचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले. तुटलेले पत्रे घरात कोसळले त्यामुळे घरातील वस्तुंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यावेळी कोणीही घरात नसल्यामुळे दुर्घटना टळली, मात्र पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे धान्य व इतर वस्तुंचे नुकसान झाले. या प्रकारामुळे त्यांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले.
तळवडे येथे घराचे पत्रे उडून गेल्याने नुकसान
