आंध्रप्रदेश येथील तीन गाड्या घेतले ताब्यात: १८ लाखाचा मुद्देमाल जप्त
⚡आंबोली, ता.२३-: येथील पोलीस चेक नाक्यावर गोवा बनावटीची एकूण ४ लाख ५३ हजार किमतीची गोव्याची दारू पकडण्यात आली तसेच १८ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यात साडे चार लाख किमतीची दारू जप्त करण्यात आली.ही कारवाई शनिवारी रात्री 2 वाजता आंबोली पोलिसांनी केली.
गोव्यावरून आंध्रप्रदेश येथे जाणाऱ्या तीन गाड्या रात्री दाणोली येथील चेकपोस्ट वर थांबवण्याचा प्रयत्न तेथील ड्युटीवरील पोलीस महेंद्र बांदेकर आणि विलास नर यांनी केला असता गाड्या बॅरिगेट्स उडवून सुसाट गेल्या.यानंतर आंबोली पोलिसांना त्यांनी आंबोली पोलिस मनीष शिंदे आणि राजेश नाईक यांना मोबाईल वरून याबाबत खबर दिली आणि संशयास्पद गाड्या थांबवण्यास सांगितले. त्यावेळी त्यात गोवा बनावटीची दारू आढळून आली.यावेळी तामिळनाडू पासिंग विटारा ब्रिझा गाडीत १ लाख ८ हजार किमतीची दारू आढळून आली.चालक लसीकरण पल्लईबाबू अपन्ना रा.आंधरप्रदेश,मोहनकृष्णाय नागसुरेश मूनगा रा.काच्चीकुलई, आंध्रप्रदेश,दुसरी बोलेरो ४लाख किमतीची आंधरप्रदेश पासिंग गाडी त्यात २लाख १ हजार ६०० किमतीची दारू पकडण्यात आली.प्रेमकुमार बाबुराव दुन्ना,नियासनगर,केसरा, आंध्रप्रदेश,तिसरी निसन तेरेना ५ लाख किमतीची गाडी त्यात १लाख ४४ हजार रुपयांची दारू पकडण्यात आली,चालक राजेश जनार्दन कालापला,सेकंड क्रॉस फोर्थ रोड ,आंध्रप्रदेश यांच्यावर बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याप्रकरणी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई हवालदार दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे,राजेश नाईक ,मनीष शिंदे यांनी केली.