शेतकऱ्यांचे मोठे नुकसान:अनेक ठिकाणी झाडे कोसळली
⚡सावंतवाडी ता.२०-: तालुक्यात गेले तीन दिवस धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. नदी-नाले, ओढे यांना पूर आल्यामुळे अनेकांनी घरातच थांबणे पसंत केले आहे. पूरस्थिती निर्माण झाल्याने भात शेती पूर्णतः पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. माडखोल गाव मध्ये मुसळधार पावसाच्या पाण्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच माडखोल पावनाई मंदिरासमोरील नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे मंदिरासमोरील पूल वाहतूक करण्यास धोकादायक बनला आहे. या संतत धार चालू असणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने ग्रामस्थ चिंताजनक. तसेच बागायतीन मध्ये पाणी शिरल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
