मालवणमधील बीएसएनएल टॉवरचे लोकेशन बदल्यास रस्त्यावर उतरु…

माजी खासदार निलेश राणे; सावंतवाडी बीएसएनएल अधिकाऱ्यांना खडसावले

⚡सावंतवाडी ता.३०-: मालवण ङतालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ठराव पारित करून जे लोकेशन बीएसएनएलला टॉवरला दिले ते लोकेशन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना धमकी देऊन बदलायला सांगितले मात्र कोणत्याही नियमाच्या बाहेर जर टॉवरचे लोकेशन बदलले तर आम्हाला संघर्ष करून रस्ता उतरावे लागेल असा इशारा आज येथे माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडीतील बीएसएनएलचे च्या कार्यालयात भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान लोकेशन का बदलायला सांगितले तर त्यांचा राजकीय हेतू त्यामुळे आज आम्ही या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या नियमात आहेत त्या नियमानुसारच करावे असल्याचे आम्ही त्यांना विनवणी केल्या असल्याचे देखील खासदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अशोक सावंत, आनंद शिरवळकर, गुरु मठकर, विनोद सावंत अनिल सावंत बंटी पुरोहित हेमंत बांदेकर,दिलीप भालेकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page