सेवांगण तर्फे देवबाग हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

⚡मालवण ता.२९-: बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण यांच्याकडून शिक्षण निधी २०२३-२४ अंतर्गत अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेतील पाच होतकरु मुला – मुलींना शैक्षणिक मदत रूपात आर्थिक सहाय्य प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही करण्यात आले.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, ज्येष्ठ शिक्षक श्री.गोसावी, आणि प्रशालेचे वरिष्ठ लिपिक श्री.उदय चोडणेकर यांच्या हस्ते मुलांना शिक्षण निधीच्या रकमा प्रदान करण्यात आल्या. यावेळी अनुष्का विनय सामंत – १३०० रु., विराज दिनकर कासवकर – १३००रु., यज्ञा महादेव केळुसकर -१२००रु., भूपाली संजय टिकम – १५००रु., झुजे दुमिंग वाडकर – १५०० रु. या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात मदत करण्यात आली.

त्यावेळी प्रशालेचे रुपेश खोबरेकर,गजानन मांजरेकर हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षण निधी दिल्याबद्दल बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण या संस्थेचे प्रशालेच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page