परुळे ग्रामपंचायतीने केली इलेक्ट्रिक घंटागाडी खरेदी…

ई रिपोर्टवर खरेदी करणारी पहिली ग्रामपंचायत..

ओरोस -केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ती मार्केटिंग पोर्टलवर संत गाडगेबाबा सह विविध उपक्रमात राज्यात चमकलेल्या परुळे बाजार ग्रामपंचायतिने इलेक्ट्रिक घंटागाडी खरेदी केली असून जिल्ह्यात ई रिपोर्टर वर खरेदी करणारी परुळे बाजार ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे
वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सह विविधक्षेत्रात राज्यात नावलौकिक मिळवलेले ग्रामपंचायत असून केंद्र सरकारने विकसित केलेल्या गव्हर्मेंट मार्केटिंग पोर्टलवर परुळे बाजार ग्रामपंचायत ट्राय सायकल इलेक्ट्रिक घंटागाडी ,बॅटरी ऑपरेट ट्राय सायकल खरेदी केली आहे त्यामुळे गावातील कचरा गोळा करण्यास मदत होणार आहे ओला सुका कचरा वर्गीकरण होण्यासही मदत होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छता अभियान उपक्रमात परुळे बाजार ही राज्यस्तरावर पोहोचलेली ग्रामपंचायत असून या अभियानाचा एक भाग म्हणून या ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रणिती आबडपालकर ,ग्रामसेवक शरद शिंदे ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या बहुमोल प्रयत्नाने या ग्रामपंचायतीने हे पहिले महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. जिल्ह्यात पहिली ई गव्हमेंट मार्केटिंग मध्ये खरेदी करणारे ग्रामपंचायत ठरल्यामुळे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता मिशन विनायक ठाकूर , राणे मॅडम, विस्तार अधिकारी ग्राप धुरी, मटकर, पाटील, पिंगुळकर मॅडम ,कामतेकर ,नाईक मॅडम यांनी बहुमूल्य सहकार्य केले असल्याचे सरपंच प्रणिती आबडपालकर त्यांनी सांगितले, परुळे हे पर्यटन दृष्ट्या विकसित असे गाव असून पर्यटनाचा एक भाग त्याचबरोबर स्वच्छतेत अग्रेसर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या गावातील विकासाबाबत सदरची ग्रामपंचायत सर्वांच्या एकजुटीने मेहनतीने विविध उपक्रम राबवीत आहे शासनाच्या या विविध उपक्रमात जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही सरपंच प्रणिती आबडपालकर यांनी केले आहे ई रिक्षासोबत फोटो

You cannot copy content of this page