कणकवली येथे आम. नितेश राणे यांनी साधला जेष्ठ कार्यकर्ता संवाद

⚡कणकवली ता.२९-: मोदी @ 9 अभियान अंतर्गत कणकवली येथे जेष्ठ कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आम. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या 9 वर्षाच्या कालावधीत केलेल्या विकास कामासंदर्भात माहिती देण्यात आली व जेष्ठांच्या समस्याही जाणून घेण्यात आल्या.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजप शहर अध्यक्ष अण्णा कोदे,प्रज्वल वर्दम,दादा कुडतरकर,मनोहर पालयेकर, नामदेव जाधव,प्रभाकर बाक्रे, राजस रेघे, सुरेश पाटकर,मंगेश मसुरकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page