आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा भाजपच्या वतीने महावितरण कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

⚡बांदा ता.२३-: भाजपा युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा शहर भाजपच्या वतीने महावितरण कर्मचारी व साफसफाई कर्मचारी यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, भाजप बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, युवा पदाधिकारी संदीप बांदेकर, राकेश केसरकर, शैलेश केसरकर, गुरु कल्याणकर, साई सावंत, डेगवे माजी सरपंच प्रवीण देसाई, मधु देसाई, बांदा महिला ग्रामपंचायत सदस्या तनुजा वराडकर, श्रेया केसरकर आदी उपस्थित होते.
जावेद खतीब म्हणाले की, आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी पावसाळ्यात रस्त्यावर राहून आपले कर्तव्य बाजाविणाऱ्या सफाई व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्वेता कोरगावकर, शीतल राऊळ यांनी मनोगत व्यक्त केले. आभार बाळु सावंत यांनी मानले.

You cannot copy content of this page