संजय पडते ; गांधी चौकात ठाकरे सेनेचे आंदोलन
सावंतवाडी ता.२३-: कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता मिंदे गटात गेलेल्या दिपक केसरकार कुठल्याही पक्षातून निवडणूकीत उतरा जनता नक्कीच पराभव करतील असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे केले. मंत्री केसरकर हे आज २२ जूनला मिंदे गटात गेल्याच्या पार्श्वभूमीवर आज गांधी चौक येथे ठाकरे गटाच्या वतीने पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले.
यावेळी पडते पुढे बोलताना म्हणाले की शून्य शिक्षकी शाळेत येत्या दोन दिवसात शिक्षक सेवक न दिल्यास शिवसेनेचा जिल्हा परिषदेवर मोर्चा निघेल असा इशारा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिला.
यावेळी 50 खोक्यांचा देखावाही उभारण्यात आला होता जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश रावळ दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्यासह बाळा गावडे ,मायकल डिसोजा, शब्बीर मणियार,वेत्ये सरपंच गुणाजी, चंद्रकांत कासार, गावडे, सुनील गावडे, श्रुतिका दळवी, भारती कासार, शिवदत्त घोगळे, आबा सावंत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना श्री पडते म्हणाले, ज्या शिवसैनिकांनी तन-मन-धन अपरात्र काम करून केसरकर यांना निवडून दिले होते. मात्र केसरकरांनी मतदारांचा व शिवसैनिकांचा कोणत्याही विचार न करता गद्दारी करून शिंदे गटात सामील झाले होते म्हणून आजचा दिवस आम्हा शिवसैनिकांसाठी गद्दार दिवस आहे. केसरकरांनी शिंदे गटात जाताना या भागाचा विकास व्हावा म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते परंतु आज वर्ष झाले तरी या भागाचा विकास झाला का हा केवळ घोषणाबाजी करणे आणि जनतेच्या डोळ्यात धुळ फेकणे हेच काम केसरकर करत आले आहे. त्यामुळे त्यांनी येणारा विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षातून निवडणुकीत उतरावे येथील शिवसैनिक त्यांचा पराभव निश्चितच करेल हे काळ्या दगडावरची रेघ आहे.
ते पुढे म्हणाले, आज शिक्षण मंत्री म्हणून काम करत असताना शिक्षण खात्याला कायम फसवण्याचे काम केसरकर यांनी केले आहे जिल्ह्यातील तब्बल 121 शाळा शून्य शिक्षकी होण्यासही केसरकरच जबाबदार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे येथे दोन दिवसात जर या शून्य शिक्षकी शाळेमध्ये शिक्षक सेवक न दिल्यास शिवसेनेचा मोर्चा जिल्हा परिषदेवर निघेल याची दखल त्यांनी घ्यावी. आज बऱ्याच ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने स्वखर्चातून शिक्षक सेवक देऊन मुलांचे होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र शिक्षण मंत्री चिडीचूप आहेत हे दुर्दैव म्हणावे लागेल. यावेळी 50 टक्के एकदम ओके जनता तुपाशी आमदार उपाशी या सरकारचं करायचं काय खाली डोके वर पाय अशा घोषणा देत मंत्री केसरकर यांचा निषेध केला.
