वेंगुर्ले बसस्थानक येथे अंमली पदार्थ जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ
⚡वेंगुर्ले ता.२०-: अंमली पदार्थ विरोधी दिन दि. १९ जून या दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्य मार्गदर्शनानुसार वेंगुर्ले पोलीस स्टेशनतर्फे दि. १९ ते २६ जून या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी वेंगुर्ले बसस्थानक येथे वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
महाराष्ट्र पोलीस दलामार्फत मार्फत १९ जून या दिवशी अमली पदार्थ दिन विरोधी दिनाचे औचित्य साधून अमली पदार्थ जनजागृती सप्ताहाअंतर्गत सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनानुसार वेंगुर्ले स्टेशनतर्फे शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ जनजागृती सप्ताहा अंतर्गत कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थितांत पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस कर्मचारी सुरेश पाटील, रमेश तावडे, टफिक पोलीस मनोज परूळेकर व गौरव परब, महिला होमगार्ड चैताली निवजेकर, वृणाली कृष्णाजी, सोबिना डिसोजा तसेच रिक्षा संघटनेचे तालुका अध्यक्ष एकनाथ राऊळ, रिक्षाचालक, एस.टी. प्रवासी व नागरीक उपस्थित होते.
या कार्यक्रमांवेळी महिला हेड कॉन्स्टेबल रंजिता चौहान यांनी, अंमली पदार्थ व त्याच्या सेवनामुळे होणाऱ्या परीणामांची माहिती देत सर्व पुरूष व महिला नागरीकांनी तसेच युवापिढीने या व्यसनापासून दूर रहावे. बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ जर कोठे विकले जात असतील तर त्याची माहिती गोपनीय रित्या पोलीस निरीक्षकांना द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.