प्राथमिक शिक्षक समिती दोडामार्ग मार्फत विद्यार्थ्यांचा गुण गौरव कार्यक्रम संपन्न….

*💫दोडामार्ग दि.२५ सुमित दळवी* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा दोडामार्ग मार्फत दोडामार्ग तालुक्यातील विविध परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्राथमिक शिक्षक समिती शाखा दोडामार्ग च्या वतीने जानेवारी 2020 मध्ये इयत्ता पाचवी साठी शिष्यवृती सराव परीक्षा घेण्यात आली होती त्या सराव परीक्षेमध्ये गुणानुक्रमानुसार तालुक्यात.टॉप टेन विद्यार्थी .कु.यशवंत अविनाश भुजबळ (शाळा सासोली नं 1) ,विठ्ठल उदय गवस (शासकिय वसाहत कोनाळकट्टा ),सुमंत सूर्यकांत सावंत (पणतुर्ली),अवनी अनंत धूपकर ( सासोली नं 1),पुष्कर दशरथ माणगावकर(कोनाळकट्टा) ,प्रज्वला झिलु चारी ( कोनाळकट्टा),मुक्ता दिनेश देसाई ( सासोली नं 1),भूमिका परब ( बोडदे ),दत्तराज हरिश्चंद्र कवळेकर (सासोली नं 1),सृष्टी संजय ठाकूर (मोरगाव नं 1) निवडले गेले. इयत्ता 10 वी परीक्षेत चिन्मय दत्ताराम दळवी (करूणा सदन स्कूल ) तालुक्यात प्रथम , राजस तानेश्वर गवसल(बांदा हायस्कूल )प्रथम ,संजना भरमा तुपारे (प्रथम )तसेच 8 वी शिष्यवृती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या(कीर्ती विद्यालय घोट्गेवाडी मधील कु.तन्वी संतोष सातार्डेकर (तालुक्यात प्रथम ), कु.पुंडलिक परशुराम कोतेकर (तालुक्यात तृतीय ) कु.अक्षता भास्कर जांबोटकर (अ.जा.प्रवर्गमध्ये प्रथम ) कु.श्रेयस सुधीर दळवी (दोडामार्ग हायस्कूल शहरी विभागात प्रथम ) तसेच ब्रेन डेवल्पमेंट परीक्षेत प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी : चिन्मय रामचंद्र तोरसकर ( शाळा साटेली भेडशी) ,तनिश्का अशोक भोसले (करूणा सदन स्कूल ),तन्मय मारुती चादेकर (पणतुर्ली )वेद दत्ताराम दळवी (करूणा सदन स्कूल ) चिण्मयी जयसिंग खानोलकर(दोडामार्ग) , एस टी एस परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय आलेल्या कु.वेदराज विठ्ठल गवस आणि ज्ञ।नी मी होणार या जिल्हा स्तरीय स्पर्धेत साटेली भेडशी शाळेच्या कु.दिग्गज दिग्विजय फडके व कु.चंद्रकांत अनिल कुबल जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला होता..या सर्व विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच साटेली भेडशी शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री दिग्विजय नागोजी फडके यांचा राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत राज्यात टॉप टेन मध्ये आल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक श्रीम.तेजा ताटे मँडम यांचा ही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक समिती जिल्हा अध्यक्ष श्री नितीन कदम ,जिल्हा सचिव श्री सचिन मदने, सुगंध तांबे ,लवू चव्हाण ,गिल्बर्ट फर्नांडिस ,जे.डी पाटील,जयसिंग खानोलकर,विठ्ठल गवस,दीपा दळवी सुधीर दळवी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी श्री दिग्विजय फडके,दत्ताराम दळवी,मारुती चांदेकर ,अमित पाटील ,कैलास पालवे ,प्रशांत झालबा यांनी विशेष प्रयत्न केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दिपक दळवी आणि आभार श्री.अशोक भोसले यांनी मानले.

You cannot copy content of this page