*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने १० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आज नव्याने २१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ६ हजार ९० झाली. आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १७३ झाली आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय १५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांची संख्या ३ एवढी आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांनी दिली. सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तर कणकवली तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ६ हजार ४२१ रुग्ण सापडले आहेत. तसेच आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १७३ झाली आहे. आतापर्यंत ३५ हजार ६४९ आर टी पी सी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४४३८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. २५ हजार ५८१ नमुन्यांची अँटी जन टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी २०९५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तालुकानिहाय पॉजिटीव्ह रुग्ण देवगड ४४१, दाेडामार्ग ३६१, कणकवली १९६४, कुडाळ १४४८, मालवण ५९१, सावंतवाडी ८४५, वैभववाडी १८५, वेंगुर्ला ५५८, जिल्ह्याबाहेरील २८. १५२ सक्रीय रुग्ण जिल्ह्यात १५२ रुग्ण सक्रिय देवगड ६, दाेडामार्ग ६, कणकवली ३१, कुडाळ ३४, मालवण ३५, सावंतवाडी २०, वैभववाडी २, वेंगुर्ला ८, जिल्ह्याबाहेरील १०.
*जिल्ह्यात आज आणखी १० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह
